बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

जातीवाचक उल्लेख कितपत योग्य ?

धनंजय मुंडे यांच्या मतदार संघात कदाचित ब्राम्हण मतदार नसावेत किंवा ते ज्या राज्यात राहतात तेथे सुद्धा त्यांच्या पक्षाला ब्राम्हणांची मत मिळत नसावीत त्यामुळेच ते अनाजी पंत ,अनाजी पंत असं बोलत फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत,एखाद्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या जातीचा हीन भाषेत उल्लेख का करावा हे न कळणारे आहे,अनाजी पंत ही प्रवृत्ती आहे मात्र मुंडे त्याला जातीची जोड देऊन वातावरण अधिक दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत,शेवटी त्यांच्या नेत्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक पुणेरी पगडी, फुले पगडी,पेशवे छत्रपतींना जहागिरी देऊ लागले अशी वक्तवे करून ब्राम्हण द्वेष दाखवून दिला होता .

कोणताही माणूस कोणत्या जातीत जन्माला यावा हे कोणाच्या हातात नसते मात्र तरीही त्याला तो ठराविक जातीत जन्माला आला म्हणून दोष देणे योग्य नाही .
अनाजी पंत ज्या पद्धतीने कारभार करीत होते तसा फडणवीस यांनी केला का,त्याची काही उदाहरणे आहेत का,जेव्हा छत्रपती उदयनराजे हे काँग्रेस मधून राष्ट्रवादी त आले आणि गेली दहा वर्षे शरद पवार ,अजित पवार आणि सगळ्याच पवार समर्थकांनी त्यांना सहन केले तेव्हा राजेंना जो मानसन्मान दिला तो कोणत्या अधिकाराने दिला हे सांगावे,पवार असोत की मुंडे यांनी काहीही वक्तव्य केले तर ते सेक्युलर आणि इतरांनी कोणतेही कृत्य केले की ते धर्मांध हा काय प्रकार आहे .

निवडणुका येतात अन जातात ,मात्र प्रचाराचा दर्जा इतका खाली जावा हे योग्य नाही,बरं ते ज्या फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत त्यांनी स्वतःच्या जातीला खूप काही मिळवून दिल आहे असंही नाही,उलट कटाक्षाने त्यांनी आपल्या स्वजातीयांच्या कार्यक्रमांना किंवा स्टेजवर जाणे टाळले आहे मग तरी हा पोटशूळ का .
मुंडे यांना पुरस्कार मिळाला किंवा कार्यक्रम असला की बंजारा महिलांनी त्यांचे पारंपरिक वेशात स्वागत केले तर चालते,शरद पवार यांना मराठा म्हणून जाणता राजा ही पदवी दिली तर चालते,छगन भुजबळ असोत की महादेव जानकर अथवा राम शिंदे यांना  त्यांच्या जातीच्या नावावर मोठमोठी पदे,संस्थान दिली तर कोणीच आक्षेप घेत नाही मात्र एक फडणवीस त्याच्या कर्तृत्वावर आणि पक्षनिष्टेवर जर मुख्यमंत्री पदावर पोहचला असेल तर त्यात त्याचा काय दोष .
आपण टीका करताना समोरच्या माणसाच्या मनाला भोक पडतील अस बोलू नये हा साधा संकेत आहे,मात्र राजकारणात सगळेच संकेत पायदळी तुडवले तरच आम्हाला साहेबांच्या दरबारात किंमत मिळते हा समज असलेल्या धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्यांना हेच प्रिय वाटले तर आश्चर्य वाटायला नको .मुंडे हे अत्यन्त चांगले वक्ते,अभ्यासू राजकारणी आहेत,परखड टीका करणारा स्व गोपीनाथ मुंडे यांच्या नंतरचा नेता म्हणून त्यांनी नाव कमावले आहे .त्यामुळे त्यांनी या पद्धतीने भाषा वापरून काय साध्य करावयाचे आहे हे ठरवावे .
राजकारणात आम्ही जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करतो ,आमच्या साहेबांनी गवई, आठवले,कवाडे,प्रकाश आंबेडकर यांना खुल्या जागेवरून निवडून आणलं हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर जी एक स्वाभिमानाची लकेर उमटते ना त्यानंतर ते जेव्हा फडणवीस यांचे नाव न घेता टीका करतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील छद्मी हावभाव खूप काही सांगून जातात .
राजकारण हे समाजाच्या उद्धारासाठी,उत्थानासाठी असावं असं म्हटलं जातं मात्र धनंजय मुंडे यांना कदाचित त्याचा विसर पडला असावा .मी एका ठराविक जातीचा आहे आणि मला राग आला म्हणून मी हे लिहितो आहे असं नाही,कारण मी पत्रकारिता करताना जात धर्म याहीपेक्षा पैसा या गोष्टीला कधीच महत्व दिले नाही.
मात्र ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक हे बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो आहे की फडणवीस म्हणजे ब्राम्हण,मोदी म्हणजे तेली,शहा म्हणजे गुजराती, मुंडे म्हणजे वंजारी,पवार म्हणजे मराठा ,राऊत म्हणजे माळी याचा खरच विचार झाला पाहिजे .
छत्रपती शिवाजी महाराज असोत की जिजामाता अथवा राजे संभाजी हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत याबद्दल कोणाला काहीच अडचण असण्याचे कारण नाही,त्या छत्रपतींनी कधी जातीभेद पाहिला नाही त्यांच्या वंशजांबद्दल बोलताना जर जाणीवपूर्वक असा जातीवाचक उलेलख जात असेल तर तो महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा आहे .

देव ,देश अन धर्मापायी प्राण हाती घेणारे छत्रपतींचे मावळे कुठं अन फुटकळ सत्तेतील पद मिळावीत म्हणून स्वतःला एखाद्या व्यक्तीच्या चरणी लिन करून मावळे म्हणवून घेणारे धनंजय मुंडे यांच्यासारखे किंवा इतर तथाकथित पुढारी,कार्यकर्ते कुठं .
हा सगळा जो प्रचाराचा दर्जा घसरतो आहे तो बुद्धीला न पटणारा आहे,निवडणूक येते अन जाते मात्र त्यामुळे मनभेद होता कामा नयेत,पत्रकारितेत एखाद्या बातमीमुळे कोणाचे आयुष्य बरबाद होणार असेल तर ती बातमी टाळलेली बरी किंवा त्यातील भाषा सौम्य वापरलेली बरी असं साधं इथिक्स शिकवलं जातं तस राजकारणात देखील टिका टिप्पणी करताना भाषेचा समतोल राखला पाहिजे हा साधा संकेत आहे,मात्र तो संकेत पायदळी तुडवण्यासाठीच असतो हा समज मुंडेंसारख्या नेत्यांमुळे अलीकडच्या काळात रूढ होऊ लागला आहे .
अनाजी पंत ज्या पद्धतीने वागले किंवा त्यांनी जी कारस्थान केली त्यामागे त्यांचा हेतू काय होता,परिस्थिती काय होती,त्यांनी का अशा पद्धतीने निर्णय घेतला हे त्यांनाच माहीत परंतु ते एका जातीचे आहेत म्हणून संपूर्ण जातीला दोष देत साप साप म्हणून भुई धोपटणे किती योग्य आहे याचा विचार ज्याचा त्याने करावा एवढीच अपेक्षा .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

८ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

जात नाही ती जात
जोपर्यंत जात हा शब्द हद्दपार होत नाही तोपर्यंत असाच वापर जातीचा राजकारणात होत राहणार हे नक्की त्यासाठी समान नागरी कायदा हाच योग्य राहील असे मला वाटते

Unknown म्हणाले...

Good say

Unknown म्हणाले...

Ati sunder mandani

InvestGuru म्हणाले...

मुळातच पवारांनी आयुष्यभर ब्राह्मणद्वेष केला मतांसाठी पण जावई मात्र ब्रह्मन् चालतो जे समाजाला कळत नाही
केवळ जातीयवादानेच राष्ट्रवादी मुळासकट समपुन जाईल
पंतप्रधान पदाचा लायक माणूस पण पार चव गेली
असो।धनंजय मुंडे चा बालिश पण आहे ब्रळून शांत होईल कारण फार कोणी गांभीर्याने घेत नाही राष्ट्रवादीला

Unknown म्हणाले...

धनंजय मुंडेच एक गद्दार आहेत.त्यामूळे त्यांना अनाजी पंतच आठवणार

ravi म्हणाले...

फडणीस कर्तृत्वावर मुख्यमंत्री झाले हे रुईकर साहेब तुम्हाला कोणी सांगितलं, इतिहास नीट तपासा शोभा फडणवीसांचा डाळ घोटाळा गोपीनाथराव मुंडे यांनी कसा बाजूला सारला व फडणीस यांना पुढे कोणी आणलं हे तुम्ही विसरू नका.... राहिला विषय कर्तुत्वाचा तेतर साऱ्या महाराष्ट्राने बघितलं की मुंडे साहेबांचा चेला हा कसा आयत्या पिठावर रेघा मारतोय...

Unknown म्हणाले...

उत्तम उत्तर अति उत्तम लेखण

Unknown म्हणाले...

जाहीर माफी मागावी

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...