रविवार, २९ नोव्हेंबर, २०१५

शनी शिंगणापूर येथे एका महिलेने शनीचे दर्शन घेतल्याने सर्वत्र गोंधळ सुरु आहे,अरे काय चालले आहे हे,महिला बहीण,आई ,बायको,मुलगी म्हणून चालते,मग तिने दर्शन घेतले तर बिघडले कुठे,

एक महिला जर या देशाची राष्ट्रपती,पंतप्रधान,मुख्यमंत्री,सरपंच होऊ शकते तर तिने दर्शन घेतले तर आकाश कोसळले का?काही लोक अशी आवई उठवतात कि हिंदू धर्मात हे झाले कि सगळे लोक टीका करतात मुस्लिम धर्माबद्दल कोणी चकार शब्द बोलत नाही,कोणाबद्दल बोलावे हे कोणीच ठरवू शकत नाही ,मात्र धर्म हे सांगत नाही कि स्त्री पुरुष भेदभाव करा म्हणून,तुमच्या आमच्या सारख्या लोकांनी आणि विशेषतः काही धर्माच्या ठेकेदारांनी हा भेदभाव निर्माण केला,

अगदी रामाच्या काळापासून अथवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून विचार केला तर स्त्री ला कधीच दुय्यम मानले गेले नाही किंवा दुय्यम माना असे संगीतले गेले नाही,उलट राम असो अथवा कृष्ण त्यांच्या सोबत राधा कृष्ण,राम सीता असा उल्लेख आढळतो,

कोणत्याही देवाने महिलांचा अपमान करा असा संदेश दिलेला नाही

मग हा प्रकार काय सुरु आहे ,जो तो ज्याला वाटेल तसा वागतो आहे,त्या महिलेने पूजा केली तर देव आणि ती बघून घेतील त्यात इतरांनी का लुडबुड करावी,हाजी अली येथे महिलांना प्रवेअह नाकारला जातो ,कारण काय कोणालाच माहित नाही,गेली महिला तेथे तर आकाश कोसळणार कि समुद्र खवळणार आहे,मात्र हे विषय जर चर्चिले गेले नाहीत तर तथाकथित धर्म मार्तंढांची दुकान कशी चालतील,

देवी असो कि देव तो एकच आहे ना,बर स्त्री आणि पुरुष असा भेद केला तरी विठलाला पूजनारा देवीच्या चरणावर माथा टेकवतोच ना,का म्हणतो मी पुरुष आहे मी फक्त देवालाच पूजनार,नाही ना मग देव फरक करीत नाही आपण का करायचा,आपण आपल्या घरात आई,बायको,मुलगी यांच्या शरीराचे नखही कोणी पाहू नये यासाठी प्रयत्न करतो मात्र रस्त्यावरून जाताना दुसऱ्या बाईकडे वळून वळून बघतो,आपला तो बाबू आणि दुसऱ्याच ते कार्ट हि वृत्ती बरोबर नाही,मध्यन्तरी कोल्हापूरच्या महालक्ष्मी ची पूजा महिलांनी करायची नाही असा आदेश निघाला का तर म्हणे देवी अपवित्र होते,देवीला चालत नाही,हे ठरवणारे कोण पुरुषच ना,असे असेल तर मग त्यांनी तरी का पूजा करावी देवीची,आपल्या घरच्या महिलांनी उघड्यावर फिरणे,वस्त्र बदलणे मान्य नाही आणि देवी ला मात्र फक्त पुरुषांनीच पुजायचे हे का?देवी हि माता आहे तिच्यावर सर्वांचा सारखा अधिकार आहे,तिच्या जवळ भेदाभेद नाही मग आम्ही तो करणारे कोण?कोणी दिला पुरुषांना हा अधिकार,

भारतातील सर्वाधिक मंदिरांचा जीर्णोद्धार हा अहिल्या देवी होळकर यांनी केला त्या सुद्धा एक महिलाच होत्या ना,इंग्रजी फौजांशी झुंजणाऱ्या राणी लक्ष्मीबाई चा आदर्श आम्ही सांगतो त्या देखील महिलाच अनेक महिलांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले हा इतिहास आपण विसरतो आहोत का?आज एकीकडे स्त्री पुरुष समानता म्हणून ढोल बदवायचे आणि दुसरीकडे महिलेने पूजा केली म्हणून गोंधळ घालायचा हे शोभणारे नाही,भारतासारख्या लोकशाही मानणाऱ्या देशात आणि महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्यात यावर एवढा गोधलं व्हावा या सारखे दुर्दैव दुसरे काही नाही,

अनेक रणरागिणी ना जन्म देणाऱ्या या महाराष्ट्रात हे घडावे म्हणजे काय म्हणावे,भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी बाई जोशी असोत अथवा महिलांना शिक्षणाची कवाडं खुली करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले असोत या महिलाच होत्या,ज्यांच्या मूळे या राज्यात क्रांती घडली,

आई ,पत्नी,मुलगी म्हणून स्त्री मान्य असेल तर तिचे हक्क ,अधिकार ,तत्व ,भावना का मान्य नाहीत हे कळतं नाही,उद्या कोणी म्हणेल तुम्ही मान्य करता का महिलांचे स्वातंत्र्य अधिकार प्रत्येक बाबतीत,यावर वादविवाद होतील ते व्हायला हरकत नाही मात्र त्यात निकोप पणा असावा बिभस्त पणा ,विनाकारण विरोध नसावा,मात्र पुरुषी मानसिकता असणाऱ्या या देशात 21 व्या शतकाकडे वाटचाल करताना हा गोधळ व्हावा हि शोकांतिका म्हणावी लागेल,

एका महिलेने शनी देवाची पूजा केली तर तिला शिक्षा देव देईल ना तुम्ही आम्ही शिक्षा देणारे कोण?हा अधिकार आपल्याला कोणी दिला,विनाकारण देवाचा ठेका घ्यायचा ,नको त्या गोष्टी करायच्या आणि त्याला विरोध झाला कि बोंबा ठोकायच्या हे बरोबर नाही,धर्म मग तो कोणताही असो हिंदू असो अथवा मुस्लिम किंवा इतर धर्म कोणत्याही धर्मात महिलांना हीन लेखा असे सांगितले जात नाही मात्र काही लोक ठरवून हे करतात हे थांबले पाहिजे असे वाटते

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...