'जीव'घेणी स्पर्धा ...................!
"गंदा है पर धंदा है ये "असा डायलॉग अनेकदा आपण चित्रपटात ऐकला असेल मात्र शिक्षणासारख्या क्षेत्रात देखील नको ते लोक उतरल्याने आणि त्यांच्यात जीवघेणी स्पर्धा सुरू झाल्याने " धंदा है पर गंदा है ये "अस म्हणण्याची वेळ आली आहे . अलीकडच्या काळात शिक्षणाच्या बाबतीत पालकवर्ग भलताच जागरूक झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे,ग्राहक तगडा आहे म्हणल्यावर दुकानदार देखील पाहिजे ती गोष्ट बाजारात विक्रीसाठी आणतो,त्याच पद्धतीने सध्याच्या शिक्षण पद्धतीचे स्वरूप पहायला मिळत आहे .नर्सरी पासून ते थेट पी जी पर्यंत महाविद्यालयांपेक्षा दुपटीने,तिपटीने क्लासेस ची संख्या फोफावल्याचे दिसून येते,याच क्लासेसच्या माध्यमातून ज्यांचा शिक्षणाशी कधीच संबंध आला नाही असे शेकडो लोक गबर झाल्याचे चित्र दिसते.ज्ञान दान हे पवित्र कार्य आहे हे वाक्य पुस्तकात चांगले वाटते,अलीकडच्या काळात काही क्लासेस चालकांनी शिक्षणाचा बाजार मांडून आपला धंदा सेट केला आहे .यातूनच क्लासेस म्हणजे दोन नंबरचा धंदा असल्यासारखे वातावरण झाले आणि त्यातूनच गँगवार उदयास आले.अविनाश चव्हाण यांच्या हत्येने ही गोष्ट अधिक गडदपणे अधोरेखित झाली आहे .
रामायण महाभारताच्या काळापासून गुरुकुल पद्धती अस्तित्वात आहे,मध्यंतरी च्या काळात दहावी बारावी पेक्षा जास्त शिक्षण म्हणजे खूप महत्वाचे समजले जायचे,मुलांना दहावी बारावीला गेल्यावर क्लास किंवा ट्युशन लावली जायची मात्र गेल्या दहा पंधरा वर्षात शिक्षण क्षेत्रात नको त्या प्रवृती आल्या आणि या क्षेत्राचा बट्याबोळ झाला .
शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राचा या लोकांनी बाजार केला,अगदी नर्सरी पासून आपल्या पाल्याला क्लास लावण्यासाठी काही लोकांनी मोहीम सुरू केली,खेळण्या बागडण्याच्या वयात मुलांचे शेड्युल एवढे बिझी केले की त्याला मैदानाची ओळखच राहिली नाही .पूर्वी सहा वर्षे होईपर्यंत शाळा म्हणजे काय हे मुलांना माहीत नव्हते,थेट पहिलीला गेल्यावर त्याची आणि शाळेची ओळख व्हायची मात्र आता मूल अडीच वर्षाचे झाले की त्याच्या मानगुटीवर दप्तराचे ओझे टाकले जाते ते थेट पी जी होईपर्यंत उरतच नाही .
ज्या वयात सूर पारंब्या,गोट्या,विटी दांडू खेळायचा त्या वयात मुलांच्या पाठीवर आणि डोक्यावर अभ्यासाचे ओझे टाकले जाऊ लागले आहे .परीक्षा आणि मार्कच्या स्पर्धेत हा बैल एकदा घाण्याला जुंपला की त्याची सुटका नाही ही नवी पद्धत आजकाल रूढ झाली आहे .मुलाचा ,मुलीचा जन्म झाला की त्याला कोणत्या शाळेत घालायचे,त्याने कोणता अभ्यास करायचा,मोठेपणी त्याने कोणते क्षेत्र निवडायचे या सगळ्या गोष्टीवर पालक नको तेवढा विचार करू लागले आणि पालकांची ही मानसिकता क्लास नावाच्या धंदेवाईक लोकांनी नेमकी हेरली .
गेल्या दहा वर्षात क्लासचे जे पेव फुटले आहे ते पाहता उबग येईल अशी परिस्थिती दिसते . नर्सरी पासून ते थेट पी जी पर्यंत क्लास घेणारे आणि तिथं मुलांना घालणारे तयार झाल्याने शिक्षणाचा बाजार मांडला गेला आहे .जो पर्यंत मराठी शाळा आणि विशेषतः जिल्हा परिषद शाळा चांगल्या अवस्थेत होत्या तोपर्यंत या क्लासवाल्याना वाव नव्हता मात्र इंग्रजी शाळांचे पेव फुटले आणि क्लास चालकांना अच्छे दिन आले .
खेड्यापाड्यात इंग्रजी शाळा सुरू झाल्याने पालकही जागरूक झाला आणि खेडी ओस पडून शहरं सुजू लागली,मुलांच्या शिक्षणाच्या नावाखाली गावाकडची जमीन विकून लोकांनी अपार्टमेंट संस्कृती स्वीकारली ,यातून मुलांचं भविष्य किती घडलं हा संशोधनाचा विषय असला तरी पालकांचं भविष्य मात्र अंधकारमय झालं.कारण पाल्याच्या काळजीपोटी माय बाप दोघेही कामाला जुंपले आणि मुलांपासून दुरावत गेले .
जे काही करायचे ते मुलांच्या भविष्यासाठी म्हणून पालकांनी स्वतः दिवसरात्र एक केला आणि मुलांची जबाबदारी क्लास चालकांवर टाकून ते मोकळे झाले .आजकालच्या पालकांकडे मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला वेळच नाही,मुलगा /मुलगी घरी अभ्यासच करीत नाही,आमचं एकतच नाही,सारख टी व्ही,मोबाईल ,गेम यावरच मुलं असतात या तक्रारी वाढल्या मात्र याला आपणच जबाबदार आहोत हे पालकांच्या लक्षात कधी आलेच नाही .
आपला मुलगा म्हणजे रोबोट आहे त्याने डॉक्टर, इंजिनियर व्हावे नाहीतर आपल्या घराण्याचा वारसा जपला जाणार नाही ही मानसिकता वाढीस लागली आणि क्लास चालकांचे धंदे वाढीस लागले .करोडो रुपयांच्या या क्लास नावाच्या इंडस्ट्रीत अनेकांनी गुंतवणूक केली,एकदा पैसा लावा आणि आयुष्यभर खोऱ्याने,जे सी बी ने पैसा ओढा असा हा धंदा सुरू झाला .
पाहिजे तेवढी फीस घ्या पण मुलाला उच्च दर्जाचे शिक्षण द्या हा पालकांचा आग्रह क्लास चालकांनी हेरला आणि नको त्या प्रवृत्तीनी यामध्ये शिरकाव करीत या पवित्र क्षेत्राचा बट्याबोळ केला .शिक्षणाचा दर्जा वाढत गेला मात्र नैतिकता कमी होऊ लागली,ज्याच्याकडे मुबलक पैसा तोच उच्च आणि चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊ शकतो ही मानसिकता वाढीस लागली .
बीड,लातूर,औरंगाबाद,नांदेड अशा शहरामध्ये क्लासेस नावाची इंडस्ट्री नावारूपाला आली,पूर्वी शाळा महाविद्यालयातून दिले जाणारे शिक्षण आता केवळ नावालाच राहिले,शाळा ,महाविद्यालये ओस पडू लागले आणि क्लास बहरू लागले .यातूनच मग क्लासच्या धंद्यात जीवघेणी स्पर्धा सुरू झाली .आपला मुलगा कॉन्व्हेंट किंवा इंग्रजी शाळेत जातो ही गोष्ट अभिमानाची झाली आणि क्लास चालकांनी पालकांच्या मनाचा ताबा घेतला,दहावीपर्यंत ज्या मुलांना क्लासची गरज नाही त्यांनाही या स्पर्धेत ढकलण्यात आले,त्यातून अनेक मुलांनी अभ्यासाचा ताण सहन होत नाही म्हणून आपली जीवनयात्रा संपवल्याचे आपण आजपर्यंत पाहिले आता मात्र क्लास चालकांच्या जीवावर उठण्याएव्हढी परिस्थिती गंभीर झाली आहे .
आजही शाळा आणि महाविद्यालयातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा उच्च आहे मात्र पालक आणि विद्यार्थी यांची मानसिकता बदलली असल्याने क्लास फोफावले आहेत .कोणत्याही शाळेत किंवा महाविद्यालयात शिकवणारे शिक्षक,प्राध्यापक यांच्या गुणवत्तेबद्दल कोणीच शंका घेऊ शकत नाही,त्या उलट क्लास चालवणारे किती शिकले आहेत हे कोणीच तपासून पहात नाही .
चाळीस पन्नास वर्षांपासून शिक्षण देणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांना पान पानभर जाहिराती देणे परवडत नसताना क्लास चालक मात्र चार चार पान भरून जाहिरातीवर करोडो रुपयांचा खर्च करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते .क्लास लावावा की नाही याबद्दल वेगवेगळी मत मतांतरे असू शकतील,सगळेच क्लास चालक बाजार मांडुन बसले आहेत असेही नाही मात्र नको त्या अपप्रवृत्ती या क्षेत्रात सुद्धा आल्याने हे क्षेत्र बदनाम झाले आहे .
लातूर येथे चार दिवसापूर्वी अविनाश चव्हाण यांची जी हत्या झाली त्यामुळे क्लास वॊर जोरात सुरू झाल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे,70 -80 च्या दशकात मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी गँगवार सुरू होते तशाच पद्धतीने आता क्लासवोर सुरू झाले आहे .मोठं मोठी आमिषे दाखवून,जाहिराती,बॅनर बाजी करून क्लास चालकांनी पैशाचा पाऊस पाडण्यास सुरवात केली.एकच विदयार्थी अनेक क्लासच्या जाहिरातीमध्ये दिसू लागला,प्रत्येक जण यशाचे दावे प्रतिदावे करू लागला,ही स्पर्धा इतकी किळसवाणी झाली की काही लोकांनी यशस्वी विद्यार्थ्यांना लाखो रुपये देऊन आपल्या जाहिरातीत ब्रँड अंबेसिडर म्हणून वापर केला .
एकीकडे राज्य सरकारने मार्क सिस्टीम बंद करून विद्यार्थ्यांचे बिघडणारे मनोबल सुधारण्यासाठी पाऊल उचलले आणि दुसरीकडे क्लास चालकांनी गुणांच्या स्पर्धा लावून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा धंदा मांडला .नव्वद टक्के विद्यार्थी शाळा महाविद्यालयांना दांडी मारून क्लास मध्ये हजेरी लावू लागले,दहावी बारावी साठी वर्षाचे लाखभर रुपये मिळू लागल्याने क्लास चालकांनी वह्या,पुस्तके,बॅग,टॅब कॅम्पलसरी केले,यामुळे जोडधंदा करणारी बांडगुळ फोफावली .
ज्या प्रमाणे सुपर स्पेशालिटी,मल्टीस्पेशालिटी अशी डॉक्टर लोकांची दुकानं उभी राहिली त्याच पद्धतीने शिक्षणाच्या क्षेत्रात क्लास चालकांनी एकत्र येऊन आपले मॉल उभारले .बीड किंवा लातूर सारख्या मागास जिल्ह्यात आज किमान एक ते दोन हजार कोटींचा हा धंदा झाला आहे .लातूर पॅटर्न च्या नावाखाली महाविद्यालयातून राजीनामे देऊन चार पाच प्राध्यापकांनी क्लासेस सुरु केले आणि आपले उखळ पांढरे करून घेतले .
आज लातूर,बीड सारख्या शहरात क्लास चालकांची संख्या शेकडो च्या घरात आहे,त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही .किती फीस घ्यावी,किती विद्यार्थी एका वर्गात असावेत,इन्फ्रास्ट्रक्चर काय असावे याकडे कोणाचेच लक्ष आणि नियंत्रण नाही . जेव्हा क्लास नव्हते तेव्हा मुलं डॉक्टर,इंजिनीअर,कलेक्टर होत नव्हते असे नाही मात्र अलीकडच्या काळात प्रत्येकालाच आपला पाल्य डॉक्टर ,इंजिनियर व्हावा वाटत असल्याने सगळीकडून त्यांची लूट सुरू आहे .
लातूर येथे जी घटना घडली त्यामध्ये जे आरोपी निष्पन्न झाले आहेत ते काही काळ चव्हाण यांच्या सोबत पार्टनर राहिलेले आहेत,चव्हाण यांचे क्लास सुरू करण्यापूर्वी काय उद्योग होते हे पाहिल्यास सगळे काही लक्षात येईल.आज बीड असो की लातूर अथवा औरंगाबाद,नांदेड सगळीकडेच बिहार,उत्तर प्रदेश,कोटा या भागातून शिकवणारे मजूर उपलब्ध होत आहेत,त्यांच्या नावाखाली काही फुटकळ लोक राजकीय वरदहस्त मिळवीत आपले उखळ पांढरे करू लागले आहेत .त्यांच्यासोबतच क्लासमधील लोकांचे काळे धंदे उघड करण्याच्या नावाखाली क्लास चालकांना ब्लॅकमेल करणारांची टोळी देखील उदयास आली .लातूर असो की बीड अनेक क्लास चालकांना अशा ब्लॅकमेल करणाऱ्यांनी पुष्कळ वेळा त्रास दिला असेल मात्र झाकली मूठ सव्वालाखाची या पद्धतीने कोणीच पुढे येऊन बोलण्यास धजावत नाही हे ही तितकेच खरे आहे .
शिक्षण क्षेत्रात ही जी माफियागिरी सुरू झाली आहे त्याला क्लास चालक जेवढे जबाबदार आहेत तेवढेच पालक म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा जबाबदार आहोत हे विसरून चालणार नाही .शाळा,महाविद्यालये किंवा क्लासेस म्हणजे डॉक्टर, इंजिनियर बनविणारे कारखाने झाले आहेत मात्र या सगळ्यामध्ये माणूसपण हरवत चालल्याने आता माणूस बनवणारे कारखाने उभारणे गरजेचे झाले आहे अन्यथा शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राला आणखी चटके सहन करावे लागतील हे निश्चित .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड 9422744404

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा