सलाम बळीराजा तुला त्रिवार सलाम बीड जिल्हा तसा मागासलेला म्हणूनच राज्यात प्रसिद्ध आहे,या जिल्ह्याने गोपीनाथ मुंडे सारखा लढवय्या लोकप्रतिनिधी दिला,तसेच मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामात आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवणारे वीर योध्ये देखील दिले,याच बीड जिल्ह्याने मागील चार वर्षात 1972 पेक्षाही भयानक दुष्काळ अनुभवला,आज मात्र बीड जिल्ह्याचा हा कलंक पुसला गेला आहे,जिल्ह्यातील धरणं ओसंडून वाहत आहेत.
मागच्या तीन चार वर्षात कधीही बातम्या करण्याची वेळ आली तर मनावर दगड ठेवून कराव्या लागायच्या,कारण केवळ भेगाळलेली जमीन,रापलेले चेहरे,भकास अन पांढरी फट पडलेली कपाळ, अनेक घरचे करते पुरुष फासावर गेलेलं या डोळ्यांनी पाहिलं आहे,अनेक शेतकऱ्यांच्या चिता जळत असताना त्याच्या घरात चाललेला आक्रोश पाहून मन हेलावून जात होतं.
वाटायचं काय एवढं पाप केलंय आमच्या जिल्ह्यातल्या लोकांनी कि हा दुष्काळाचा कलंक पुसतच नाहीए, जनावरांचे अनेक बाजार फिरलो,लाखाचे सर्जा राजा कवडीमोल भावाने विकताना पाहिल्यानंतर मन विषण व्हायचं,कधी फिटणार हे दिवस असं वाटायचं,दुष्काळाचा फटका केवळ शेतकार्यालाच बसला होता असे नाही तर संपूर्ण बाजारावर त्याचा विपरीत परिणाम जाणवत होता,बियाणे बाजार असो की किराणा अथवा कापड बाजार प्रत्येक ठिकाणी दुष्काळाचे दशावतार दिसत होते.अगदी रियल इस्टेट वर देखील याचा गंभीर परिणाम दिसत होता,प्रत्येक जण दुष्काळाने पिचलेला दिसत होता,या दुष्काळानं बीड जिल्ह्याला दहा वर्षे मागं ढकललं,
यंदा मात्र मिरगाचा पाऊस जोरदार बरसला,त्यामुळे पिचलेल्या बळीराजाने मोठ्या उमेदीने काळ्या आईची ओटी भरली,वरूनराजांना देखील कृपा केली शेतकऱ्याच्या पदरात यंदा चांगलं दान पडणार असं दिसतं होत,मात्र महिनाभर पावसानं ताण दिला आणि बळीराजाच्या चिंतेत भर पडली,मात्र पोळ्याच्या अमावस्येला पावसाचं पुनरागमन झालं आणि बळीराजाचा जीव भांड्यात पडला.मात्र गणपती विसर्जनापासून पावसानं मनावर घेतलं आणि मागील तीन चार दिवसात पावसानं अक्षरशः बीड जिल्ह्याला झोडपून काढलं.जिल्ह्यात मागील आठ दहा वर्षांपासून कोरडा पडलेला बिंदुसरा तलाव भरभरून वाहिला एवढंच नाही तर मृत साठ्यात असलेली माजलगाव आणि मांजरा सारखी मोठी धरणं देखील ओव्हरफ्लो झाली.
उपर वाला जब भी देता ,देता छप्पर फाडके असं म्हणतात ते बीड करांनी मागील दोन दिवसात अनुभवलं,48 तासात मागच्या चार वर्षाचा दुष्काळ फिटला, सगळीकडे पाणीच पाणी झालं,नद्या ,नाले ,ओढे ,खळखळून वाहू लागले,बिंदुसरा,मांजरा,माजलगाव सारखी कोरडी ठाक पडलेली धरण भरली,भूगर्भाची पाण्याची भूक भागली,पुढच्या चार पाच वर्षांची चिंता मिटली,पावसाने सगळ्यांचं कल्याण केलं,
बीड जिल्ह्यातील 144 छोटे आणि मोठे तलाव भरून वाहू लागले आहेत,जलयुक्त शिवार च्या कामामुळे शिवारात पाणी खेळू लागलं आहे, जिल्ह्यातील भूगर्भातील पाणी पातळी देखील चांगलीच वाढली आहे,जिल्ह्यातील विहिरी ,आड आणि बोअर ला भरपूर पाणी आलं आहे, पावसानं समद रान आबादानी केलं आहे,काळ्या मातीत मातीत तिफन चालते,तिफन चालते,मैना राघूच्या जोडीला हिरवं सपान पाहते अशी परिस्थिती आज जिकडे तिकडे झाली आहे .
मात्र या पावसानं बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला,आज दिवसभर गुडघाभर चिखलात रानावनात हिंडलो,बातमी शोधताना शेतकऱ्यांच्या व्यथा काय आणि किती असू शकतात हे जाणवलं,पाऊस नाही पडला तर दुष्काळ,आणि जास्त झाला तर ओला दुष्काळ,जगायचं कास हाच खरा प्रश्न मात्र तरीही बळीराजा आपले पाय घट्ट मातीत रोवून उभा आहे,अनेक शेतात जमीन खरवडून गेली आहे,तर शेकडो हेक्टर क्षेत्रावरील मळणी साठी आलेली बाजरी आडवी झाली आहे,फुलं आणि बोन्ड लागलेला कापूस पार जमिनीवर झोपलाय,अनेक शेतात तर पाणीच बाहेर निघालेलं नाही,सोयाबीन पुरतं संपलंय,
चार दिवस झाले शेतात जायला रस्ता देखील ठेवला नाही या पावसानं,अक्षरश धूळधाण झाल्याचं चित्र दिसून आलं,आता काय करायचं हा प्रश्न बळीराजाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता मात्र सलाम त्याच्या जिद्दीला,अनेकांनी सांगितलं" साहेब यंदा बक्कळ पाऊस झाला,खरीप हातचं गेलं,मातर अवनदा जे गेलं ते म्होरल्या टायमाला जोमानं यील कि,असला पाऊस लई गरजेचा हुता,आता बघा म्होरला हंगाम रब्बी कशी येति ते,पुढच्या तीन चार वर्षाची ददाद मिटविली बघा या पावसानं 'असं म्हणून त्यांनी पावसाचं स्वागत केलं,तेव्हा वाटलं खरच बारा महिने शेतीत राब राब राबणाऱ्या या माणसाला बळीराजा का म्हणतात ते कदाचित या मुळेच असावं,सलाम बळीराजा तुला आणि तुझ्या धैर्याला ,सलाम तुझ्या मोठ्या मनाला,सलाम तुझ्या मोडण्यातून हि उभं राहण्याच्या जिद्दीला,सलाम तुझ्या सकारात्मक दृष्टीला,तू असाच खंबीर रहा, मग बघ कोणी तुझं काहीच वाकडं करू शकणार नाही.
लक्ष्मीकांत रुईकर
9422744404

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा