बऱ्याच दिवसांनी नव्हे तब्बल दोन अडीच महिन्यांनी आज तीच दर्शन झालं,कस आहे ना,की कोणतीही व्यक्ती असो,वस्तू असो,प्राणी असो आपल्याला त्याच्या सहवासाची सवय जडली ना की भेट नाही झाली तर अस्वस्थ होतं, तसच काहीस तीचंही झाल्याची मला जाणीव झाली .
कधी नव्हे ते आज मी आवरून सावरून लवकर उठून तिच्याकडे जायचं ठरवलं,लेकर सुद्धा होते सोबत,खरतर त्यांच्यामुळेच मला तिची रोजची सवय झाली होती,आज तिच्याकडे जात असताना वाटेत लागणारी झाड,वेगवेगळी दुकानं, त्यावरील पाट्या,गतिरोधक,एवढच काय तर रस्ता देखील मी तिच्याकडेच चाललोय या कल्पनेने मोहरून गेल्याची जाणीव मला क्षणोक्षणी होत होती .
बरं तीला भेटायचं म्हणजे वेळेच भान अन बंधन ठेवावं लागतं हे नक्की .उग आपलं उठलं की सुटलं तिला भेटलं अस चालत नाही .तब्बल अडीच महिन्यांचा विरह काय असतो हे तिच्या पहिल्याच शब्दातून मला जाणवलं ।
"अरे आलास का,काय केलंस दोन अडीच महिने,माझी साधी आठवण सुद्धा झाली नसेल ना,माझं नशीबच फुटक आहे म्हणा,दरवर्षी हा अडीच महिन्यांचा विरह मी पाचवीलाच लिहून आणलाय "तिचे हे शब्द सकाळी सकाळी कानावर पडले अन कुठंतरी मलाच माझी लाज वाटली .विचार आला की खरंय राव आपण गेल्या अडीच महिन्यात हिचा जरासुद्धा विचार केला नाही,आपण आपल्या संसारात एवढं गुरफटून गेलो की ही काय करत असेल,एकटी बोर होत असेल का,कोणी सोबत असेल की नाही,याचा जर सुद्धा विचार आपल्याला आला नाही .
"ए एवढा काय विचार करतोस,सोड यार,आलास ना,मला खूप छान वाटलं,आज एवढ्या मोठ्या कालावधीनंतर तू दिसलास अन माझं मन भरून आलं,कोणीतरी आपलं हक्काचं माणूस आलंय म्हणून अधिकाराने बोलले रे, नाहीतरी तुमच्याशिवाय आहे कोण मला,वर्षातले दहा महिने सोबत असते ना तुझी म्हणून राहवल नाही,आणि जरा जोरात बोलले,रागावलास का रे "या शब्दांनी मी पुन्हा भानावर आलो .
यावर्षी 17 जूनपासून लेकरांच्या शाळा सुरू होणार म्हणून मागच्या महिनाभर दप्तर,पुस्तकं, पाट्या,पेन्सिल, पेन,कव्हर,टिफिन बॅग,टिफिन बॉक्स अस काही काही खरेदी सुरू होती,त्या अगोदर महिनाभर रखरखत्या उन्हात कुठं बाहेर जाण्याचा मूड नसल्याने घरातच मस्त आय पी एल अन नंतर इलेक्शन चा आनंद घेतला .आज सकाळी सकाळी लेकीच्या शाळेत गेलो अन त्या शाळेनं अधिकार वाणींन मला मानतल सांगितलं .
खरंच तसं पाहिलं तर ती एक इमारत,दगड विटांनी बांधलेली, मात्र कच्चे बच्चे,शिक्षक,हेडमास्तर आणि हो पालक यांच्या गोंगाटाने ती फक्त इमारत राहतच नाही,ती आपल्या कुटुंबातिलच एक बनून जाते.म्हणून तर तब्बल अडीच महिन्यांनी मी तिच्या समोर गेल्याने ती अधिकाराने बोलली .प्रत्येकाच्या आयुष्यात शाळा हा अविभाज्य घटक आहे,कोणाला ती साहेब बनवते तर कोणाला व्यापारी अन कोणाला काही .शेकडो हजारो जण तिच्या अंगाखांद्यावर खेळून मोठे झालेले असतात .अलीकडच्या काळात तर लेकरू अडीच तीन वर्षांच झालं की त्याला तिच्या हवाली केलं जातं .
तस पाहिलं तर ती म्हणजे काळ्या कृष्णची जशी यशोदा तशीच या सगळ्या बालगोपाळांची यशोदा म्हणावी लागेल .कारण लेकरू जेवढ्या वेळ आई बापाकडे असतं तेवढाच वेळ तिच्या देखील कुशीत अन मुशीत असतं .आई बाप जसे आपल्या लेकरावर चांगले संस्कार करतात तसेच संस्कार ती सुद्धा त्याच्यावर करते .ती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी असते अन सोबतही असते म्हणून तर आपण सगळे पालक बिनधास्त असतो नाही का .
अशी ही शाळा आज जेव्हा मी तिच्या जवळ गेलो ना तेव्हा मला पाहून दिलखुलास हसली,काही क्षण प्रेयसी माझ्याकडे बघून हस्ते आहे असं वाटलं,काय फिलिंग होत राव ते काय सांगू .पोरीला सहावीच्या ,दुसऱ्या पोरीला दुसरीच्या अन तिसऱ्या कृतिकाला युकेजी च्या वर्गात सोडलं तेव्हा ती जेवढ्या आस्थेवाईकपणे बोलली ना त्याला तोड नव्हती .
तिच्या आवाजात आईची काळजी,बापाचा धाक होता.आता तब्बल दहा महिने माझी अन तिची रोज भेट होत राहील,न चुकता,हो हो न चुकता,कारण रविवार असला तरी मी कधी कधी तिला मुद्दाम भेटायला जातो .आपलं लेकरू रडल,पडलं,त्याला लागलं तर आपण जेवढं जपतो ना तेवढंच न पेक्षा अधिक ती करते,खरंच आपण कधीच विचार करीत नाही की उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन अडीच महिने ती काय करत असेल,रोज शेकडो हजारो पोरांच्या सोबतीची सवय लागलेल्या तिला हा अडीच महिन्याचा काळ खायला उठत असेल नाही का .आपलं घरातलं एक माणूस एक दोन तास नजरेआड गेलं तर आपण कावरेबावरे होतो, आपल्याला करमत नाही,मग शाळेची तर काय अवस्था होत असेल,विचार करूनच अंगावर काटा आला .
अव्यक्त अशा ती च्या मनातल्या भावना ऐकून खूप छान वाटलं,सजीव प्राणी,माणूस असो किंवा एखाद रोप,झाड,वेल, अथवा एखादी निर्जीव वस्तू,त्यांना सुद्धा कोणीतरी हक्काचं हवंच असतं ना,सहवासान जीव जडतो अन जीव जडला की विरहाचा त्रास होतो अस म्हणतात ते काही खोटं नाही हे मला तिच्याशी बोलल्यावर उमगलं .खूप काही बोललो आम्ही सांगेन पुन्हा कधी तरी निवांत,तोपर्यंत रोज तिच्या भेटीची ओढ कायम राहो हीच इच्छा !
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
942274440